पुणे : पत्रकार आणि फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. त्यांच्यामागे विवाहित बहीण व कुटुंबीय असा परिवार आहे.

चांदोरकर यांनी ‘केसरी’मधून पत्रकारितेस सुरुवात केली. पुढे विविध दैनिकात तसेच ई-टीव्हीसह दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी त्यांनी काम केले. वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थ आणि ती मिळण्याची ठिकाणे यावर त्यांनी लिहिलेले ब्लॉग वाचकप्रिय ठरले. ‘सर्वज्ञ मीडिया’ ही माध्यम सल्‍ला सेवा त्यांनी सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर त्यांनी ङ्कमॅन ऑन मिशन महाराष्ट्रङ्ख हे पुस्तक लिहिले आहे. राज्य शासनाचा पहिला समाज माध्यम पत्रकारीता पुरस्कार त्यांना 2015 मध्ये मिळाला.

चांदोरकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकारिता, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांदोरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा