बीजिंग : तैवानला सामील करून घेण्यासाठी शांततापूर्ण प्रयत्न केले जातील, अशी भूमिका चीनने घेतली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनने तैवानवर हल्‍ला केल्यास अमेरिकाही तैवानच्या सुरक्षेसाठी उतरेल, असा इशारा दिला होता. तसेच अमेरिका आणि कॅनडाच्या युद्धनौकाही रवाना केल्यानंतर चीनने ही मवाळ भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. दरम्यान, चीनचे खायचे दात आणि दाखवायचे दात यात मोठे अंतर आहे. कारण पुढील महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची सीमेवरील प्रश्‍नांबाबत एक महत्त्वाची बैठक होत आहे.

दुसरीकडे तैवानविरोधात चीन बळाचा वापर करणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना चीनच्या सरकारचे प्रवक्‍ते मा शिओगुंग यांनी सांगितले की, आम्ही शांततापूर्ण एकीकरणाच्या बाजूने आहोत.

चीनमध्ये 1949 मध्ये नागरी उठाव झाला होता; तेव्हा तैवान हा चीनपासून विभक्‍त झाला. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांचे सरकार तैवानमध्ये स्थापन केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांंत तणाव आणि वाद आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा