पुणे : मागील दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती कायम आहे. बुधवारी दीर्घ कालावधीनंतर सूर्यदर्शन झाले. दुपारनंतर ऊनही पडले होते. पावसाच्या विश्रांतीमुळे हवेतील गारठाही कमी झाला आहे. आज (गुरूवारी) शहरात अंशत: ढगाळ वातावरण असणार असल्याचा अंदाज आहे. तसेच मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहरात येत्या मंगळवारपर्यंत आकाश अशत: ढगाळ असणार आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही कोसळणार आहेत. ऊन पडल्यामुळे कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. शनिवारपासून तपमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. शहरात 1 जूनपासून 789.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. विदर्भात मात्र काही प्रमाणात पाऊस कायम आहे. आज (गुरूवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र उद्या (शुक्रवार) पासून राज्यातील पावसात घट होणार आहे. मागील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा