आदित्य ठाकरे यांनी डागली तोफ

मुंबई, (प्रतिनिधी) : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील एक लाख नोकर्‍यांची संधी गेली आहे. बल्क ड्रग पार्क गेल्यामुळे 80 हजार रोजगारांची संधी हुकली. आता मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी चेन्नईमध्ये नोकरभरती केली जाणार असल्याबद्दल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सरकारवर टीकेची तोफ डागली.

मुंबईतील वर्सोवा वांद्रे सी लिंकचे काम करणार्‍या कंत्राटदाराने चेन्नईतील वृत्तपत्रात जाहिरात देऊन तेथे नोकरभरती सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन यावरून सरकारला धारेवर धरले.

वर्सोवा वांद्रे सी लिंकचे काम अनेक वर्षे बंद होते. आता या प्रकल्पाचा पूर्वीचा कंत्राटदार बदलून नव्या अ‍ॅपको इन्फ्राटेक प्रा. लिमिडेट या कंपनीची नियुक्ती झाली आहे. या कंपनीने नोकरभरतीसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवले आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर, प्लॅनिंग प्रोफेशनल इंजिनियर ते सिनियर ऑफिसर, मरीन पायलिंग इंजिनियर, मरीन स्ट्रक्चर इंजिनियर मरीन फॅब्रिकेशन इंजिनियर, प्लॅन अँड मशिनरी इंजिनियर, मरीन लॉजिस्टिक ऑफिसर, मरीन सेफ्टी एन्व्हारन्मेंट ऑफिसर अशा विविध पदांसाठी वाँक इन इंटरव्हयू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा