बंगळुरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे छायाचित्र असलेले फलक बुधवारी राजधानी बंगळुरूमध्ये झळकले. त्यावर मुख्यमंत्र्यांना पैसे द्या, असे लिहिल्यामुळे खळबळ उडाली आहे. सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी हे फलक झळकविण्यात आल्याची चर्चा आहे.

फलकावर पेटीएमप्रमाणे क्यूआर कोड आणि त्यावर बोम्मई यांचे छायाचित्र होते. त्यावर 40 टक्के रक्‍कम स्वीकारली जाईल, असे म्हटले होते. ’पे सीएम’ असे लिहिले होते. सरकारी कंत्राटे आणि नोकरीसाठी लाच घेतली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी बोम्मई यांचे छायाचित्र असलेले फलक शहरात झळकविल्याची चर्चा आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने हे फलक हटविण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा