सामाजिक कार्याच्या नावाखाली देशविरोधी कृत्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAने आतापर्यंतची सर्वात मोठे छापेमारी केली. देशातील विविध राज्यात केलेल्या छापेमारीत १००हून अधिक लोकांना अटक केली आहे. NIA ने PFI शी संबंधित केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसमसह १२ राज्यात छापेमारी केली. NIA पाठोपाठ ईडीने देखील पीएफआयच्या विविध ठिकणी छापे टाकले.

तपास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आतापर्यंत १०६ जणांना अटक झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने PFIशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. मंजेरीमध्ये PFI चा चेअरमन ओमा सालेम यांच्या ठिकाणावर देखील छापे टाकण्यात आलेत. या छाप्यात ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ओमा सलेमसह पीएफआयच्या केरळ राज्याचा प्रमुख मोहम्मद बशीर, राष्ट्रीय सचिव वीपी नजरुद्दीन आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी कोया यांना ताब्यात घेतले.

NIA आणि ईडीने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बिहार, नवी दिल्ली आणि आसाम यासह १२ राज्यात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात देखील २० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकलेत, तर उज्जेनमधून ४ जणांना ताब्यात घेतले आहे. बिहारमधील पूर्णियामध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. हे छापे टेरर फंडिग प्रकरणी टाकले आहेत.

तेलंगणामध्ये ANIने हैदराबाद आणि चंद्रयानगुट्टा येथील PFIचे कार्यालय सील केले आहे. तामिळनाडूत एनआय आणि ईडीने कार्यालय सील केले, मात्र या कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यानी विरोध सुरू केला.

कोणत्या राज्यात किती ठिकाणी छापे
केरळ – २२
महाराष्ट्र – २०
कर्नाटक – २०
आंध्र प्रदेश – २०
आसाम – ५
दिल्ली – ३
मध्य प्रदेश – ४
पुड्डुचेरी – ३
तामिळनाडू – १०
उत्तर प्रदेश – ८
राजस्तान -२

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा