पुणे : पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने बालेवाडी परिसरातील संतप्त नागरिकांनी महापालिका पाणी पुरवठा अधिकार्‍यांना बालेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कोंडून ठेवल्याची घटना बुधवारी घडली.

बालेवाडी परिसरात नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत. याबाबत पाणी पुरवठा अधिकार्‍यांसह आयुक्तांना अनेकवेळा तक्रारी करुनदेखील यावर योग्य ती उपाय योजना झालेली नाही. त्यामुळे बालेवाडी येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या भागातील नागरिकांचे म्हणणे मांडण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग अधिकार्‍यांना एकत्र बोलावले असता, संतप्त नागरिकांनी अधिकार्‍यांना घेराव घालत बालेवाडी येथील विठ्ठल मंदिरात कोंडून ठेवले.

यामध्ये पाणी पुरवठा अधिकारी एकनाथ गाढेकर, श्रीधर कामत, अशोक सांगडे, लाईन मन भाऊराव पाटोळे तसेच एल अँड टी च्या एका अधिकार्‍याचा समावेश आहे.

बालेवाडी गावठाणात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी आमच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. मंदिरात कोंडून ठेवले. तरी या भागातील पाणीपुरवठयात सुधारणा केली जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता, प्रसन्न जोशी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा