काठमांडू : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा एजंट म्हणून काम करणाऱ्याला नेपाळमध्ये ठार करण्यात आले. १९ सप्टेंबरला काठमांडूमध्ये आश्रय घेतलेल्या ठिकाणाबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिली. त्या नुसार, तो भारतात आयएसआयच्या बनावट नोटांचा सर्वात मोठा पुरवठादार होता.

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोर आयएसआय एजंटवर गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. त्याची ओळख पटली असून लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी असे नाव आहे.

आयएसआयच्या सांगण्यावरुन, लाल मोहम्मद पाकिस्तान, बांगलादेशमधून बनावट भारतीय चलन आधी नेपाळमध्ये आणायचा आणि नंतर भारतामध्ये पुरवठा करायचा. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल मोहम्मदचे संबंध अंडरवर्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या डी-गँगशीदेखील होते. त्याने आयएसआयच्या इतर एजंट्सनाही आश्रय दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा