नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षांत भारताच्या विकासदर वाढीत घट होईल, असे म्हटले आहे. भारताचा जीडीपी 7.2 नव्हे तर 7 टक्के राहील, असे एडीबीने सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) पहिल्या तिमाहीत जीडीपी 13.5 टक्के नोंदविला गेला होता. मात्र, उर्वरित काळात ही गती कायम राहण्याची शक्यता कमी आहे. कठोर पतधोरण आणि वाढती महागाई याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणे अपरिहार्य असल्याचे एडीबीने ताज्या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा