सव्वा कोटींची देणगी

तिरूपती : तिरूपती येथील भगवान वेंकटेश्‍वरा मंदिराला मुस्लिम भाविकाने सव्वा कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अब्दुल घनी, असे त्यांचे नाव आहे.अब्दुल घनी हे मंदिराला अनेक वर्षांपासून विविध वस्तू भेट देत आले आहेत. त्यात वाहन, फर्निचरचा समावेश आहे. गेल्या तीन दशकांपासून ते तिरूपतीला दान देत आले आहेत. कुटुंबांसह ते बालाजीचे दर्शन घेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी फर्निचर, भांड्यांच्या रूपात 87 लाख, तसेच 15 लाखांचे डिमांड ड्राफ्ट देवस्थानला देणगी म्हणून दिले.

फर्निचर आणि भांड्यांचा वापर हा प्रामुख्याने अति महत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी असलेल्या अतिथीगृहात केला जातो. रोख रकमेचा वापर हा अन्नप्रसादात भाविकांंना देण्यात येणार्‍या मोफत भोजनासाठी केला जात आहे.

हैदराबादच्या एका दानशूराने 1984 मध्ये बालाजीला 108 सुवर्णकमळे दान केली होती. गर्भगृहातील मूर्तीवर ती सुशोभित करावीत, अशी विनंतीही त्यांनी केली होती. ही भेट पाहून गहिवरून गेलेल्या पुजार्‍यांनी अष्टदल पाद पद्मरथना या नावाचा विधी सुरू केला. या विधीवेळी प्रत्येक सुवर्ण कमळ अर्पण करताना वेंंकटेश्‍वराची 108 नावे घेतली जातात. या सेवेचा लाभ आता बर्‍याच भाविकांना होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा