नवी दिल्‍ली : ईशान्य दिल्‍लीतील सीमापुरी परिसरात मालमोटारीखाली चिरडून चौघांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.

रस्त्याच्या दुभाजकावर चौघेजण झोपले होते. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेली मालमोटार दुभाजकावर झोपलेल्या चौघांच्या अंगावरून गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब उघड झाली. मालमोटारीने दिल्‍ली परिवहन महामंडळाचे आगार पार केले. त्यानंतर सिग्‍नल ओलांडून ती पुढे आली आणि दुभाजकावर झोपलेल्या चौघांच्या अंगावरून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चालक अतिवेगाने मालमोटार चालवत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपायुक्‍त आर. सत्यसुंदरम यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या मते दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयात हलवले. त्यामध्ये एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू, तर दुसर्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मालमोटारीने प्रथम विजेच्या खांबाला धडक दिली.झोपलेल्या सहापैकी मृत पावलेले चौघेजण आणि दोन जखमी हे उत्तर प्रदेशातील शाहीदाबादचे रहिवासी आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा