पुतीन यांची घोषणा; निवडणुका घेणार

कीव्ह : युक्रेनचे जे भूभाग जिंकले आहते, ते रशियाचे अधिकृत बनविण्यासाठी तेथे निवडणुका घेण्यात येतील, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरू आहे त्यामध्ये कोणाचीही सरशी होत नाही. दुसरीकडे युक्रेनने रशियाच्या सीमेवर धडक मारून खार्कीव्ह पुन्हा ताब्यात घेतले आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जो भूभाग आता रशियाच्या ताब्यात आहे. तो रशियाचा अधिकृत बनविण्याचा घाट पुतीन यांनी घातल्याचे स्पष्ट होत आहे.

देशाला संबोधित करताना पुतीन म्हणाले, ताब्यात घेतलेला युक्रेनचा पूर्व आणि दक्षिण भाग रशियाचा अधिकृत भाग बनविला जाईल. त्यासाठी या भागात मतदान केले जाईल. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या चार भागांचे लचके तोडले आहेत. त्यात लुहान्सक, खेरसोन, झापोरझ्झिया आणि डोनत्सक प्रांताचा समावेश आहे; पण युक्रेनने प्रत्याक्रमण करून ते पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास रशियाला युद्धाला सामोरे जावे लागणार आहे.

पुतीन म्हणाले, अंशत: एकत्रीकरणाच्या वटहुकमावर मी स्वाक्षरी केली आहे. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरु केली जाईल. एकत्रीकरणाची व्याख्या सांगताना ते म्हणाले, या भूभागातील ज्या नागरिकांना लष्करी अनुभव आहे, त्यांना भरती करून घेतले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा