नवी दिल्ली : सुमारे 12 वर्षे जुन्या नीरा राडिया ‘ऑडिओ लीक’ प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) नीरा राडिया आणि अन्य दोघांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणाशी संबंधित संभाषणे तपासण्यात आली. मात्र, यात कोणतेही गुन्हेगारी कृत्य आढळून आले नाही, असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सांगितले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी काल सीबीआयतर्फे भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास 5,800 संभाषणे तपासण्यात आली, असे भाटी यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सांगितले. या खंडपीठात न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा