मेक्सिकोमध्ये गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बंदूकधारी व्यक्तीने गुरुवारी सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मे महिन्यातही अशीच घटना घडली होती. मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता.

स्टेट ऍटर्नी जनरल ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात १९ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बरेच जण जखमी होते, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती. चार महिन्यातील ही पाचवी घटना होती.डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त लष्करी अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये तीन लाखांहून हून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा