अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबईतील पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी दोन बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन गृहनिर्माण सचिवांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या पत्रात शरद पवार याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणाचे शरद पवार हेच ‘रिंग मास्टर’ असून, त्यांच्या सहभागाची उच्चस्तरीय करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. गोरेगाव येथील वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकासात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा