लंडन : राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या पार्थिवावर सोमवारी शाही इतमामात विंडसर किल्ल्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभरातील 500 देशांचे राष्ट्रप्रमुखांसह दोन हजार पाहुणे अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह अन्य देशांच्या प्रमुखांचा समावेश होता.

वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे त्यांचे पार्थिव असलेली शवपेटी अंत्यदर्शनासाठी ठेवली होती. ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य चालविणारी राणी अशी त्यांची ख्याती होती. स्कॉटलंड येथील बालमोरल किल्ल्यातील राजप्रासादात एलिझाबेथ यांचे आठ सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंंतर त्यांचे पार्थिव असलेली शवपेटिका लंडन येथे अंत्यदर्शनासाठी आणली होती.

संसदेतील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे ठेवली होती. लाखो नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पुष्पगुच्छ अर्पण करून शेवटचा निरोप दिला. प्रथेप्रमाणे दहा दिवसांनंतर अंत्यसंस्कार केले.

सोमवारी सकाळी बंदूक असलेल्या वाहनावर राणीचे पार्थिव असलेली शवपेटी ठेवण्यात आली. त्यावर राजचिन्हे ठेवली होती. त्यात राजमुकुट, राजदंड आणि पृथ्वीच्या प्रतिकृतीवर ख्रिश्‍चन धर्माचे प्रतीक असलेला क्रॉस यांचा समावेश होता. त्या शवपेटीसोबत राजघराण्यातील व्यक्‍ती चालत होत्या. त्यात एलिझाबेथ यांचा पुत्र आणि इंग्लंडचा नवा राजा तिसरा चार्ल्स, त्यांचे राजपुत्र विल्यम, हॅरी आणि त्यांच्या पत्नी अ‍ॅनी, अँंड्र्यू आणि एडवर्ड, विल्यम यांचा मुलगा जॉर्ज, चार्लटी यांच्यासह राजघराण्यातील सदस्य होते. विंडसर किल्ल्यात त्यांचे पती फिलिप यांच्या कबरीजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राणीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी, तसेच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंच्या ंसंख्येने जनसमुदाय लोटला होता. नि:शब्द शांततेत अंत्ययात्रा अनेकांच्या पाणावलेल्या डोळ्यांनी सुरू होती.

  • वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेतील घंटा एलिझाबेथ यांच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षासाठी 96 वेळा वाजवण्यात आली.
  • सकाळी 9:24 वाजता पहिली आणि रात्री 11 वाजता शेवटची घंटा वाजवण्यात आली.
  • गॉथिक कॅथेड्रलमध्ये जगभरातील राजे, राज्यप्रमुख आणि राजकीय नेते आले होते.
  • 800 जणांनाच विंडसर किल्ल्यात प्रवेश दिला होता.
  • अंत्ययात्रा लंडनच्या रस्त्यांवरून बंदुकींच्या गाडीवर काढली गेली.
  • कोरोनात योगदान देणार्‍या परिचारिका नॅन्सी ओनिल आणि 1200 जणांना मोफत जेवण देणारे प्रणव भानोत आलेे होते.
  • 5 हजार 949 लष्करी जवान, 10 हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात, रॉयल नेव्हीच्या 142 जवानांनी बंदूक असलेले वाहन ओढले
  • विंडसर किल्ल्यात एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा