चौकशीची राज यांची मागणी

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी वेदांता प्रकल्पासंदर्भात वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा. सत्य लोकांसमोर यायला हवे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त केली, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. पदाधिकार्‍यांच्या बाबतीत अनेक गंभीर तक्रारी कार्यकर्त्यांकडून समजल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात इतका गोंधळ यापूर्वी कधीही बघितलेला नाही. कोण कोणासोबत जातो, कधीही जातोय याचा आता नेम उरलेला नाही. पहाटे शपथ काय घेतली जाते, चार भिंतीआड कधीही न ठरलेल्या गोष्टी सांगून 25 वर्ष जुनी मैत्री तोडून आजन्म विरोधक राहिलेल्यांना सोबत घेऊन सत्ता काय स्थापित केली जाते, हा सर्व गोंधळ राज्याच्या राजकारणात यापूर्वी कधीही बघितलेला नाही. हा एका प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आणि प्रतारणा असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा