बेलग्रेड : ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. या सामन्यात 0-6 ने मागे असलेल्या पुनियाने दमदार पुनरागमन करत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराला 11-9 ने पराभूत करून पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक होते. याआधी महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कांस्यपदक जिंकले होते.

तत्पूर्वी, बजरंगला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन डायकोमिहलिसने पराभूत केले होते. त्यानंतर बजरंगने रेपेचेजच्या माध्यमातून कांस्यपदकाचा सामना गाठला आणि जिंकला. रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात बजरंगने आर्मेनियाच्या वेगेन टेवान्यानचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. आणि निर्णायक क्षणांमध्ये आपल्या अनुभवाचा उपयोग करून भारताला पदक जिंकून दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा