सातारा : या वर्षीच्या एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात जून महिन्यातील अपुर्‍या पावसामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून जलविद्युत निर्मितीला मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर अपेक्षित वीज निर्मिती सुरू आहे. मध्यंतरीची तूट भरून काढत कोयनेच्या चार प्रकल्पातून आजपर्यंत 740 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 24.750 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे. यावर्षी जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळी हंगामात कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षारंभाला अपेक्षित पाऊस नसल्याने सिंचनापेक्षाही वीज निर्मितीबाबत सार्वत्रिक चिंता वाटत होती. जुलै ऑगस्ट व सध्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस व सिंचन व वीज निर्मितीसाठी मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर चिंता मिटली आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात आज पर्यंत चार वीज निर्मिती प्रकल्पातून 740.369 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा