मुंबई : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर परवानगी दिली आहे. बीकेसीच्या दुसर्‍या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी केलेला अर्ज फेटाळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दसरा मेळाव्यासासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळाले नाही, तर पर्यायी व्यवस्था म्हणून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने बीकेसी मैदानासाठी अर्ज केला होता. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. त्यापैकी एक शिंदे गटाला मिळाले आहे. मात्र, ठाकरे गटाने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आहे.

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने आम्ही अर्ज केला होता. ते पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कवरील सभेसाठी आधी परवानगी मागितली आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे, ही परंपरा कधी थांबली नाही, असे सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा