मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राउत यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेेष न्यायालयाने सोमवारी 14 दिवसांची वाढ केली. आर्थिक गैरव्यवहारपकरणी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्र प्रकरणी कोठडीत वाढ केली आहे.

सक्‍तवसुली संचलनालयाने (ईडी) राज्यसभेचे खासदार संजय राउत यांना 1 ऑगस्ट रोजी गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. ईडीने या प्रकरणी आणखी एक पुरवणी दोषारोपपत्र गेल्या आठवड्यात दाखल केले होते. त्यात संजय राउत यांचे नाव होते. मनी लाँड्रींग प्रकरणात जामीन मिळावा, असा अर्ज त्यांनी विशेष न्यायालयात दाखल केला होता. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाशी संबंधित प्रवीण राउत यांच्यासह अन्यजणांना समन्स पाठविले आहे. दुसरीकडे न्यायालयाने संजय राउत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांनी वाढ करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 सप्टेंबरपर्यत पुढे ढकलली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा