लंडन : राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (सोमवारी) सुमारे 10 लाख नागरिक येतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. राणीचे पार्थिव संसदेतील वेस्ट मिनस्टर अ‍ॅबे येथे ठेवले आहे. अंत्यसंस्कारापूर्वी 10 लाख नागरिक अंतिम दर्शनसाठी येतील, असा अंदाज लंडनच्या वाहतूक विभागाने वर्तविला आहे. 8 सप्टेंबर रोजी राणीचे निधन झाले होते.

तेव्हापासून अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. सोमवारी गर्दी आणखी वाढणार आहे. देशभरात 250 विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. हिथ्रो विमानतळावरील 100 पेक्षा जास्त उड्डाणे गर्दी टाळण्यासाठी रद्द केली आहेत. सोमवारी सुमारे 1 हजार 200 विमान उड्डाणावर परिणाम होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा