उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : केंद्रातील निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अशी संस्था उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन असे संस्थेचे नाव असेल. ही संस्था शेती, आधुनिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे काम करेल, असे फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राकडून निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. निती आयोगानेही यावर काही सूचना मांडल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात निती आयोगाच्या धर्तीवर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन ही संस्था उभारण्याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर या संस्थेची एकूण रचना आणि कामाचे स्वरूप याविषयी माहिती देऊ, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा