बीजिंग : चीनच्या गुइझोउ प्रांतात रविवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एक प्रवासी बस उलटून 27 जण ठार, तर 20 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सांडू ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, 47 प्रवाशांना घेऊन जाणारी बस गुइझोउ प्रांत आणि मियाओ ऑटोनॉमस प्रीफेक्चरमधील कियानन बुई येथे एक्स्प्रेस वेवर पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.

खाणीत पाणी; १४ कामगारांचा मृत्यू

चीनमध्येच दुसरीकडे लोखंडाच्या खाणीत पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली असून, त्यात 14 कामगारांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. चिनी अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, बेपत्ता व्यक्तीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला खाणीत पाणी भरण्याची घटना घडली होती. तंगशान शहराच्या सरकारने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. शोध आणि बचाव कार्य संपले असल्याची माहिती देण्यात आली. 2 सप्टेंबर रोजी खाणीला पूर आल्याचे कारण शोधले जात आहे. ही खाण हेबेई प्रांतात बीजिंगपासून 160 किलोमीटर पूर्वेला आहे. हेबेईमध्ये लोहखनिज आणि पोलाद खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा