मुंबई : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करून गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी याबाबतचे संकेत दिले. पण, हे माझे व्यक्तिगत मत असल्याचे त्यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही; परंतु हा मोठा निर्णय असून हे माझे व्यक्तिगत मत आहे. याबद्दल शिक्षक संघटना, संस्था चालक त्यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेत असताना पालक, शिक्षक, संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा