ईडीचा आरोप; जामीन देण्यास विरोध

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यहारात शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख भूमिका होती. पडद्यामागे राहून त्यांनी सर्व सूत्रे हलवली आणि आर्थिक अफरातफर केली असा आरोप करत सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या जामीनास विरोध केला. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना जुलै अखेर अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात मनी लाँड्रींगसंदर्भात गुन्हा दखल आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा