चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका

हैदराबाद :धार्मिक उन्मादाला चालना देणार्‍या मंडळींचे हैदराबाद मुक्‍ती आणि हैदराबाद स्टेटचे भारतात विलिनीकरण करण्यात काहीच योगदान नाही. तसेच ही मंडळी आता तेलंगणातील जनतेत विभाजनाची बिजे पेरत असल्याची टीका मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली.

हैदराबाद येथे तेलंगण राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, विभाजनवादी तत्त्वांना तेलंगणाच्या इतिहासात काहीच स्थान नाही. राजकीय फायद्यासाठी काही मंडळी इतिहासाची तोडमोड करत असल्याची टीका यांनी भाजपवर केली. ते केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांच्या टीकेला उत्तर देताना बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, हैदराबाद मुक्‍ती संग्राम दिवस हा मतांच्या राजकारणासाठी अधिकृतरित्या तेलंगणमध्ये साजरा केला जात नाही. निवडणूक आणि आंदोलना दरम्यान सत्तेवर आल्यावर हैदराबाद मुक्‍ती संग्राम दिन साजरा करण्याचे वचन दिले होते. पण, रझाकाराच्या भीतीने त्यांनी त्याकडे पाठ फिरविली होती, अशी टीका त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा