मुंबई : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द केला आहे. लहान मुलांची उत्पादने करणारी ही कंपनी असून मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे एफडीएने सांगितले.

कंपनीची पावडर ही बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रयोगशाळेत पावडरची तपासणी केली तर तिचा ’पीएच’ मूल्य अधिक असून ती मुलांच्या त्वचेसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. कोलकाता येथील केंंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार कंपनीचा परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात ही पावडर बालकांच्या त्वचेसाठी हानीकारक असल्याचे स्पष्ट झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा