आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई, (प्रतिनिधी) : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या ‘कट कमिशन’मुळेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप गुरूवारी केला.

या प्रकल्पासाठी मागच्या सरकारने ना सामंजस्य करार केला, ना कोणती परवानगी दिली, ना संमती पत्र दिले. मग नेमक्या वाटाघाटी कसल्या सुरू होत्या? असा सवाल करताना, या सर्व बाबींची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.महाराष्ट्रात तळेगाव येथे होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा