मुंबई : यंदा गणपती उत्सवामध्ये जोरदार जल्लोष पाहायला मिळाला. गणपतीच्या आधी दहीहंडीदेखील अत्यंत जल्लोषात साजरी झाली. मात्र यामध्ये काही वाद्य वाजवणारे किंवा लाऊड स्पीकर लावणारे गणेश मंडळ यांच्याकडून आवाजाची पातळी कमालीची गाठली गेली. दक्षिण मुंबईत सर्वात जास्त 120 डेसिबल ध्वनी पातळी गाठली गेली. तर, त्यानंतर शास्त्रीनगर या भागात 118 डेसिबल एवढा आवाजाची पातळी नोंदवली गेली. तसेच गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन होते त्या ठिकाणीदेखील 106 डेसिबल इतका आवाज वाढला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा