हैदराबाद : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी खासदार कृष्णम राजू यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. येत्या पिढ्या त्यांची सिनेमॅटिक तेज आणि सर्जनशीलता लक्षात ठेवणार, ते समाजसेवेतही आघाडीवर होते आणि राजकीय नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कृष्णम राजू हे ’बाहुबली’ स्टार प्रभासचे काका होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार, त्यांना कोविडची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे, हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा