तमिळनाडू : दुलिप चषक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या अजिंक्य रहाणेकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा आजपासून ते 25 सप्टेंबरदरम्यान तमिळनाडू येथे होणार आहे. रणजी चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार्‍या मुंबईच्या खेळाडूंचे संघात वर्चस्व राहिले आहे.

रहाणेसह पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, शार्दूल ठाकूर या मुंबईच्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठी आणि सत्यजित बच्छावलाही संघात स्थान मिळाले आहे.

पश्चिम विभागाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, शार्दूल ठाकूर, राहुल त्रिपाठी, सत्यजित बच्छाव, हित पटेल, चिंतन गाजा, जयदेव उनाडकट, चिराग जानी, अतित शेठ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा