पुणे : मागील आठवडाभरापासून राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवार पासून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला.
कोकक आणि गोव्यात येत्या बुधवारपर्यंत मेघगर्जना आक्षि वीजांच्या कडकडाटात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुइळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विदर्भात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे.
मागील 24 तासात कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील घाटमाथ्यावर पावसाचे सातत्य कायम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरण व तलाव क्षेत्र पाऊस सुरूच आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम असणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस
राज्याप्रमाणे पुणे शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस कायम असणार आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरातील कमाल आणि किमान तपमानात घट झाली आहे. शहरात सकाळी ऊन पडत आहे, तर सायंकाळी ढगाळ वातावरण होत आहे. शनिवारी दुपारी मध्यवस्तीत पावसाचा शिडकावा झाला. तर 1 जूनपासून कालपर्यंत शहरात 675.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा