पुणे : सार्वजनिक साप्ताहिक सुटी आणि पाचव्या दिवसाच्या गणेशविसर्जनामुळे रविवारी मुख्य शहरात गणेशभक्तांची अलोट गर्दी झाली. मंडळासमोर ढोल ताशा पथकांचे स्थिर वादनाने परिसर दणाणून गेला. प्रबोधनात्मक, ऐतिहासिक, सामाजिक विषयांवरील देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील दुर्तफा रस्ते नागरिकांनी तुडूंब भरले होते.

मानाच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी मध्यभागातील प्रमुख मंडळाने साकारलेले देखावे पाहिले. संध्याकाळी सर्वच मंडळांनी देखावे भक्तांसाठी खुले केले.

रविवारची सुटी असल्याने सकाळी 11 वाजल्यापासून नागरिकांनी मध्यवर्ती भागातीत मंडळच्या गणरायाचे दर्शन घण्यसासाठी बाहेर पडले. मंडळांतर्फे संगीत, ढोलताशा वादनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिवसभर पाच दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. छत्रपती शिवाजी रस्ता आणि थोरले बाजीराव पेशवे रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्त्यावर गर्दी दिसून आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी मंडळांचे व ढोलताशा पथकांचे कार्यकर्ते गणेशभक्तांना वाट काढून देत होते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्याबरोबर गणेशोत्सवात तरुणाईंचा सहभाग दिसून आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा