न्यूयॉर्क : गेली 25 वर्षे लॉन टेनिसमध्ये अधिराज्य गाजविणारी सेरेना विल्यम्स हिने शनिवारी टेनिस जगताला भावपूर्ण निरोप दिला. अमेरिकन ओपन स्पर्धेत अजला टोपलीजानोव्हिक सोबत झालेल्या सामन्यातील पराभवानंतर तिने लॉन टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे.
लॉन टेनिस खेळात रमणारी, तसेच लॉन टेनिस म्हणजे सेरेना विल्यम्स, असे जणू समीकरणच काही वर्षांत झाले होते. सेरेना अमेरिकन ओपन जिंकण्याच्या तयारीनेच मैदानात उतरली होती. चाहते तिचा खेळ पाहण्यासाठी सज्ज होते. परंतु, पराभवामुळे तिच्याबरोबरच चाहत्यांचा हिरमोड झाला. तिचा खेळ आणि विजय पाहण्यासाठी ऑर्थर अशे स्टेडियम खचाखच भरले होते. मोबाइलचे कॅमेरे तिच्या विजयाची प्रतीक्षाच करत होते. विजयी फटका मारताच तो क्षण टिपण्यासाठी चाहते सज्ज होते. परंतु, चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. शुक्रवारी रात्री हा सामना रंगला होता. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा