नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीत 27 ऑगस्टपासून सुरू होणार्या टी-20 आशिया चषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रिकेट आकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड स्पर्धेसाठी जाणार नाहीत. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे. द्रविडची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तो संघात सामील होणार आहे. लक्ष्मण संघाचा केएल राहुल, दीपक हुडा आणि आवेश खान यांच्यासह हरारेहून दुबईला पोहोचेल.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी 28 ऑग्स्टला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर दुसरा सामना 31 ऑगस्टला याच मैदानावर होणार आहे.