समृद्धी धायगुडे

आज आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या वर्षात बऱ्याच विशेष गोष्टी घडल्या, घडत आहेत. मात्र या सर्व घडामोडींमध्ये महत्वाचा वाटा असलेले अगदी चांगल्या वाईट घटनांचे साक्षीदार असलेले ते म्हणजे डिजिटल माध्यमे. मग ही माध्यमे वैयक्तिक असो सामाजिक असो ती उद्यापासून आजपर्यंत नित्यनेमाने आपल्याला सेवा देत आहेत. थोडक्यात वैयक्तिक उन्नतीचे साधन असलेले डिजिटल माध्यम हे देशाच्या अमृत महोत्सवात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

देशाच्या तरुणाईचे प्रत्येक अपडेट मिनिटा मिनिटाला झेपणारे हे माध्यम देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर खोलवर परिणाम करत आहे. या माध्यमाचा वापर करून कोणी उद्यनोमुख कलाकार आपल्या आवडत्या क्षेत्रात वाटचाल करत आहे. शिकाऊ उमेदवारांचा गुरु आहे.

मोबाईलच्या प्रगती बरोबर हळू हळू स्मार्ट होत आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेल्या या माध्यमाला अमृत महोत्सवाच्या दिवशी विसरून कसे चालेल.देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल माध्यमामुळे एक स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

गेले काही दिवस सर्व समाजमाध्यमांवर तिरंगा आणि त्याविषयीच्या गप्पांनी भारावलेली दिसतात. त्यात कोणत्याच वयोगटातील व्यक्ती मागे नाही. अगदी स्वत:चा डीपी बदलल्यावर दुसऱ्यांनीही तसे करण्याचा विनंतीवजा आग्रह केला जातो आहे. त्यामुळे व्हॉटस्ॲप फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, स्नॅपचॅट या समाजमाध्यमांवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा ट्रेण्ड झाला आहे.

आजच्या डिजिटल युगात आपल्या जवळपास सगळ्याच घडामोडींचे अपडेट समाजमाध्यमांवर टाकणारी तरुणाई या इतक्या महत्वाचे गोष्टीत कशी मागे राहील? प्रत्येक सणवाराच्या रंगीत, थ्रीडी शुभेच्छा तरुणाईचा डिजिटल माध्यमाकडे असणारा कल लक्षात घेऊनच स्वातंत्र्य दिनासाठी ही डिजिटल आखणी केली गेली आणि तिला भरभरून प्रतिसादही मिळतो आहे.

या डिजिटल सेलिब्रेशनची माहिती जाहीर वेगाने युजर्स पर्यंत पोहोचल्यानंतर सध्याच्या शास्त्राप्रमाणे रीतसर डिजिटल चर्चा नि वाद घडलेच. भारतीय ध्वजाच्या पार इतिहास, भूगोलासह थेट वर्तमानापर्यंत विषयांची सविस्तर चर्चा, छायाचित्रांसह करण्यात आली. त्यानंतर काहींनी आपापली मतं प्रतिबिंबित व्हावी, अशी छायाचित्रे डीपी म्हणून किंवा कव्हर फोटो म्हणून ठेवली. हरतऱ्हेच्या शैलीत आणि ढंगात देशाचा तिरंगा प्रत्येकाच्या डिजिटल खिडकीत डौलात झळकताना दिसला.

अर्थात, काहींनी अजूनही आपले डीपी किंवा कव्हर फोटो बदललेले नाहीत. म्हणजे ते काही देशप्रेमी नाहीत असे नाही, पण त्यांचे विचार वेगळे असू शकतात. प्रत्येकाला मिळालेले हे डिजिटल स्वातंत्र्याचा आदरच ठेवायला हवा. डिजिटल घडामोडीपेक्षा त्यांचा प्रत्यक्ष कृती करण्यावर अधिक विश्वास असावा. अजूनही बरेच युवकी असे आहेत जे थेट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागी असतात. काही जण समाजमाध्यमांवर डीपी वा इन्स्टा फोटोच्या माध्यमातून आपण जे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रम करतो त्याची वाच्यता करत नाहीत. पण ते आपल्या पद्धतीने प्रत्यक्ष कार्यातून आपली देशप्रेमाची भावना जपताना दिसतात. एकंदरीत देशातील प्रत्येक नागरिकांच्या स्वतंत्रतेच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत.

डिजिटल माध्यमांमुळे यशस्वी कलाकार झालेल्यांची खूप उदाहरणे या निमित्ताने देता येईल. डिजिटल माध्यमांमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाही थोड्याफार प्रमाणात हातभार लागलेला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला, नेत्याला, व्यावसायिकांना या माध्यमाचा चांगलाच उपयोग झालेला दिसतो. त्यामुळे भविष्यात या स्वातंत्र्याचे क्षितिज विस्तारणारेच आहे यात शंका नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा