इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ऑगस्ट अखेर पाकिस्तानला १.१८ अब्ज डॉलरची राहिलेली मदत करणार आहे. परकीय चलनाचा साठा संपत चालल्याने पाकिस्तानात आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तविल्यानंतर पाकिस्तानने धावपळ करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरले होते. त्या अंतर्गत ही मदत दिली जात आहे.

चीन, सौदी अरेबियासह चार मित्र राष्ट्रांनी ४ अब्ज डॉलरचा द्विपक्षीय वित्तपुरवठा झाल्यानंतर ३१ ऑगस्ट अखेर पाकिस्तानच्या खात्यात ही रकम वर्ग होणार आहे.

या संदर्भातील पत्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्राप्‍त झाल्याचे अर्थमंत्री मिफताह इस्माईल यांनी सांगितले. याबाबतचा करार गेल्या महिन्यात करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडून आलेल्या पत्राला सकारात्मक उत्तर दिल्यानंतर आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा