मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मुंबई संदर्भातील वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. पक्षाने त्यांना मौन बाळगण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना पाहून पाठ फिरवली तेव्हा या अंदाजाला हवा मिळाली. कोश्यारी यांनीही त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली, तरी पक्ष पूर्ण सतर्क आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर भाजप आता एक-एक पाऊल जपून टाकत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा