नवी दिल्‍ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) निवडणूक होत आहे. भाजप प्रणीत लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखर आणि काँग्रेस प्रणीत संयुक्‍त लोकशाही पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होत आहे. संख्याबळ पाहता धनकर यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. एकूण 790 जण मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. त्यामध्ये राज्यसभेचे 233 सदस्य असून, 12 राष्ट्रपती नियुक्‍त आहेत. लोकसभेचे 543 सदस्य असून दोन नियुक्‍त आहेत. त्यामुळे 395 मते मिळविणारा उमेदवार निवडून येणार आहे. राज्यसभेत भाजपचे 91 सदस्य तर लोकसभेत 303 सदस्य आहेत. त्यामुळे धनखर यांचे पारडे निवडणुकीत जड आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा