मुंबई : (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवार, इच्छुकांची संख्या, खातेवाटपाची रस्सीखेच यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गाडी अजूनही अडकलेलीच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस शनिवार-रविवार दिल्लीला जात असून, मंगळवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. फुटीर आमदारांची अपात्रता व सत्तांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीबरोबच विस्तारही लांबत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीला सहा चकरा झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन येतायत. अचानक शपथविधी ठरला तर गडबड नको म्हणून अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा