नवी दिल्‍ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी दिल्‍ली दौर्‍यावर आहेत. त्यामुळेे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. याबाबत पत्रकारांनी शिंंदे यांना प्रश्‍न विचारला. त्यावर त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले.

शिंदे यांनी सांगितले की, आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एक बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे. तसेच नीती आयोगाबरोबरच रविवारी बैठक आहे. अशा दोन बैठकींंसाठी मी दिल्‍ली दौर्‍यवर आलो असून या दौर्‍याचा मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी काहीही संबंध नाही.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यानी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण किंवा अडथळे नाहीत. तो लवकरच होणार आहे. खात्यांची जबाबदारी ही सचिवांकडे दिली आहे. त्यामुळे कोणतेही काम थांबलेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायचे आहेत ते घेतले जात आहेत. उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शिंदे यांच्या अगोदर दिल्‍लीत आले आहेत. दोघांचाही शासकीय कामासाठी दौरा आहे. दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा होत आहे.

शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावरून विरोधकांनीही टीका केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा