सोलापूर, (प्रतिनिधी) : चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर स्वत:चा 400 पानांचा खुलासा देऊन रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे सोपविला. पण, दोन्ही चौकशी समित्यांच्या कचाट्यात अडकलेल्या ग्लोबल टीचरचा राजीनामा मंजूर होणे अशक्य आहे. राजीनामा मागे घेण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने त्यासंदर्भात त्याच दिवशी ग्लोबल टीचरचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांना काल शुक्रवारी तसे कळविले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्युआर कोड’ शिक्षणप्रणाली देणार्‍या परितेवाडी (ता. माढा) येथील झेडपी शाळेवरील उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एका वर्षानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. पण, जवळपास 32 महिन्यांत ते एकदाच त्याठिकाणी गेल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा