पुणे : शहरामध्ये स्वाईन फ्लू पुन्हा डोकेवर काढत आहे. 15 जुलै पासून आजपर्यंत तब्बल 120 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 20 दिवसामध्ये रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षामध्ये कमी दिवसात जास्त स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 15 जुलैच्या ते 4 ऑगस्ट दरम्यान 120 रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सध्या 165 रुग्ण स्वाईल फ्लू बाधीत आढळले आहेत. जुलैमध्ये स्वाइन फ्लूमुळे दोन मृत्यू झाले होते. जानेवारी ते 30 जुलैपर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लू संसर्ग किंवा प्रामुख्याने डुकरांमध्ये आढळतो. ताप, आळस, शिंका येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि भूक कमी होणे या लक्षणांचा समावेश आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा