नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

येत्या काही दिवसात बरेच सण, उत्सव भारतात साजरे केले जातील. यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गासह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.

देशात कोरोनाचे आढळले १९ हजार ४०० नवे रुग्ण

नवी दिल्‍ली : देशात कोराना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला आहे., एका दिवसांत 19 हजार 406 पेक्षा जास्त जणांना कोरोना झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 4 कोटी 41 लाख 256 हजार 994 झाली असून सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 34 हजार 793 झाली.

49 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा हा 5 लाख 26 हजार 649 वर पोहोचला. मृतांमध्ये केराळातील 11 जणांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येची टक्केवारी 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा