मुंबई : राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये बदल केल्याने राज्य निवडणूक आयोगाने 25 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित केली आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात बदल करून सदस्यसंख्या किमान 50 व कमाल 75 करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध केला आहे. जिल्हा परिषदेच्या जागांच्या संख्येत बदल होणार असल्याने सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना, तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे.

निवडणूक स्थगित झालेल्या जिल्हा परिषदा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा