मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ’सामना’च्या संपादकपदाची धुरा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली आहे.जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक जणांनी बंड पुकारले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्य मंत्रीपद सोडावे लागले होेते. बंडानंतर पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. याच दरम्यान त्यांनी ’सामना’चे संपादकपद स्वीकारले आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संपादकपद सोडले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या संपादक झाल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा