श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था अधिकच सुधारल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन वर्षांतील हे समाधानकारक चित्र असून 88 टक्के गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.

5 ऑगस्ट 2019 रोजी 370 कलम रद्द केले होते. त्यानंतर जम्मू -काश्मीर आणि लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर केले होते. या घटनेला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 ऑगस्ट 2026 पासून ते 4 ऑगस्ट 2019 पर्यंत गुन्ह्याचे प्रमाण 3 हजार 686 एवढे होते. पण, 5 ऑगस्ट 2019 पासून तीन वर्षे पुढे गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. केवळ 438 गुन्हे घडले असून गुन्ह्यांचे प्रमाण हे 88 टक्क्यांनी कमी झाले आहे. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी कायदा आणि सुव्यवस्था राखताना 124 नागरिकांचा मृत्यू झाला; परंतु यानंतर एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. 2016 ते 2019 दरम्यान सहा पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. 5 ऑगस्ट 2019 नंतर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. विशेष म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 पूर्वी तीन वर्षे दहशतवादी हल्ल्यांच्या 930 घटना घडल्या. त्यानंतर पुढील तीन वर्षे हे प्रमाण केवळ 617 झाले. तसेच कलम हटविण्यापूर्वी 290 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. परंतु त्यानंतर हे प्रमाण आता गेल्या तीन वर्षांत 174 पर्यंत खाली आले आहे. दहशतवादी हल्ल्यात नागरिक ठार होण्याचे प्रमाण घटले असून ते 191 वरून 110 पर्यंत गेल्या तीन वर्षांत आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा