काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीजवळ शुक्रवारी मोटारीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात िआठ जण ठार तर 18 जण जखमी झाले. पश्चिम काबुलमधील शियाबहुल सार-ए कारेझ भागात बॉम्बस्फोट झाला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाने प्राणघातक स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. या स्फोटानंतर जखमी मदतीसाठी इकडे तिकडे धावत होते. कट्टरपंथी दहशतवादी गटाने अल्पसंख्याक शिया समुदायावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. 2014 पासून अफगाणिस्तानमध्ये ही संघटना कार्यरत आहे. त्यामुळे सुरक्षा दलासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा