मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसते. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही, जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राणेंनी दिला. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांविषयीच्या प्रश्नांना नितेश राणेंनी बगल दिली.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, भाजप नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अहमदनगरच्या कर्जतमध्येही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राणेंनी दिले.

आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार राहिले नाही, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत, हिंदूंना टार्गेट केलंत, तर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते, असा स्पष्ट संदेश मला द्यायचाय, असे नितेश राणे म्हणाले.

आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचे ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावले उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचे नितेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा